पुणे ,दि.०७ पुण्यातील पोलीस रिसर्च सेंटर (CPR) येथे सोमवार (ता. ६) रोजी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, पत्रकारांसाठी एक दिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन संपन्न झाले.
या प्रसंगी अँड. मिलिंद दातरंगे, अँड. गीता गोडांबे, सायबर तज्ञ संदिप गादिया, सहायक पोलीस आयक्त (निवृत्त) संभाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस व पत्रकार यांचे घनिष्ट संबंध निर्माण होण्यासाठी या एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात
आले होते. कायद्याचे मुलभूत हक्क व अधिकार, महिला आणि बाल गुन्हेगारी, सायबर क्राईम, न्यायप्रक्रिया आणि महत्वाचे निकाल अशा विविध विषयांवर तज्ञांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि शंकांचे निराकरण तज्ञांनी केले.
अँड. दातरंगे म्हणाले की, पत्रकारांनी कायदे आणि न्याय व्यवस्था यांचा अभ्यास केला पाहिजे. न्यायव्यवस्था कशी चालते हे पाहिले पाहिजे. न्यायालयीन प्रक्रिया काय आहे. हे समजुन घेतले पाहिजे. कायद्या समोर सर्व समान आहेत. भारतीय राज्य घटनेशी संबंधीत कायदे असावेत. विसंगत नको.
अँड. गोडांबे म्हणाल्या की, कौटुंबीक हिंसा ( कलम ४९८ )
महिला आणि बाल गुन्हेगारी या विषयी बोलताना मुळे कुटुंबातील अनेक सदस्य अडकले कुटुंबांवर जातात. याचा परिणाम होत संपुर्ण विपरीत असतो. पत्रकारांनी बातमी करताना आरोपीला फोकस केले पाहिजे. पिडित कुटुंबीयांना नाही. परिणामी, समाजातील विकृती कमी होण्यास मदत होईल. डोमेस्टीक अॅक्ट नुसार पिडीत महिलेला थेट न्यायालयाकडुन दाद मागता येते.
सायबर क्राईम बाबत माहिती देताना सायबर तज्ञ संदिप गादिया म्हणाले की, टेक्नॉलॉजीचा वापर करुन गुन्हे
केले जातात. आजुबाजूला अनेक तांत्रिक माध्यम आहेत जी तुमची फसवणुक कधी आणि कशी करतील. हे सांगता येत नाही. मोबाईल हि आपली ओळख आहे. आपली हि ओळख चोरली जाते. डिजीटल फूटप्रिन्ट हा पुरावा आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक माहिती हि गोळा केली जात असते. त्यामुळे प्रत्येकाने सजगता बाळगणे आवश्यक आहे. छोट्या-छोट्या चुका तुम्हांला गुन्ह्यात शकतात. अडकवु
सहायक पोलीस आयुक्त (निवृत्त) संभाजी पाटील म्हणाले की, पोलीसांप्रमाणे प्रत्येक नागरिकाला मुलभुत अधिकार दिलेले आहेत. विविध कलमांची माहिती घेवुन प्रत्येक नागरिक हा जबाबदार नागरिक म्हणुन समाजामध्ये आपले कर्तव्य बजावु शकतो. पत्रकारांनी सत्य घटनांचे वृत्तांकन केले पाहिजे. बातमी लिहिताना पोलीसांची बदनामी होणार नाही. याबाबत सतर्क असले पाहिजे. क्राईम रिपोर्टर असलेल्या प्रत्येक बातमीदाराला कायद्याचे ज्ञान घेणे आवश्यक आहे.
या कार्यशाळेस व पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, उपस्थित असलेल्या पत्रकार,व संपादक कार्यशाळा पार पडल्यानंतर त्यांना कार्यशाळेत सहभागी झाल्याबद्दल पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी सर्टिफिकेट देऊन रोखठोक,व व कायद्याच्या चौकटीत बातमी करणाऱ्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.