पुणे,दि.११:- मुंबई येथै पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर, मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ रात्री सात वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दाखल झाली.
या वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनवर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
यावेळी खासदार,आमदार, नगरसेवक, व कार्यकर्त्या, पुणे रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर, रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
पुणे रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेस येणार असल्यामुळे नागरिकांनी सायंकाळी ४ वाजल्यापासून मोठी गर्दी केली होती. गाडी येण्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होते. गाडीचे आगमन होताच ढोल ताशा वाजवून स्वागत केले. मुंबई येथून आलेले प्रवासी उतरले आणि मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर गाडी सोलापूरकडे रवाना झाली. पुणे स्थानकात वंदे भारत एक्स्प्रेस मधून शाळकरी मुले,रेल्वे अधिकारी, प्रमुख पाहुणे, पत्रकार, यांनीही पुणे दौंड रेल्वे स्टेशन पर्यंत ‘वंदे भारत एक्सप्रेस’ रेल्वे प्रवासाचा घेतला आनंद,