पुणे,दि.१५:- पुणे विद्यापीठ चौकात मेट्रोचे उड्डाण पुलाच्या काम चालू झाल्याने व या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी पुणे विद्यापीठ चौक व गणेश खिंड रस्ता परिसरातील वाहतूकीत बदल करण्याचे नियोजन केले होते. मात्र, आता गणेशखिंड रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.
मेट्रोकडून अतिरिक्त बॅरिकेडिंग केले जाणार असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक व परिसरामधील वाहतूकीत बदल करण्याचे आदेश 8 फेब्रुवारी रोजी काढण्यात आले होते. व चतु:श्रृंगी, शिवाजीनगर, खडकी वाहतूक विभागातील वाहतूकीची परिस्थिती पाहता गणेशखिंड रोडवरील वाहतूक पुर्ववत करण्याचा निर्णय पुणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. तसा नवा आदेश बुधवारी काढण्यात आला आहे.