पुणे,दि.२१:- घरकाम करणाऱ्या एका मोलकरणीने आपल्या मालकीणीच्याच घरात चोरी केल्याचा प्रकार औंध परिसरात उघडकीस आला आहे.
या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.२० रोजी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान स्पायर्स, औंध बाणेर लिंक रोड येथील एक महिला
वय ४७ यांच्या घरी संशयित एका महिला मोलकरीण म्हणून काम करते.
यांच्या बेडरूमधील कपाटात ४ लाख ५४ हजार रुपयांचे दागिने ठेवले होते
घरात काम करत असताना मोलकरीण हिने कपाटातील दागिने चोरून नेले असा तिच्यावर आरोप आहे. ४ लाख ५४ हजार रुपयांचे ऐवज चोरून नेला. सदर बाब मालकीणीच्या लक्षात आल्याने त्यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास
सहा. पोलीस निरीक्षक, झरेकर करीत आहे