पुणे,दि.२५ :- पुणे शहर परिसरातील खराडी बायपास रोड परीसरात परिसरात बेकायदेशीरपणे पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम मटका जुगार खेळत व खेळवत असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी १६ जणांनान ताब्यात घेऊन ३४ हजार ७१० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवार (दि.२४) रोजी केली आहे. विमानतळ पोलिस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण पैशांवर जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी १६ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ३४ हजार ७१० रुपय किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १६ जणांवर विमानतळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ताब्यात घेण्यात आलेल्या १६ जणांना पुढील कारवाईसाठी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ही सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, या पथकाने यशस्वी केली आहे.