पुणे,दि.०९:- पुणे नगर महामार्गावर नियमांचे धडे देणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरती कारवाई करणाऱ्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहनाकडूनच होत आहे नियमांचे उल्लंघन यावरती कारवाई करणार कोण असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मार्च महिना आला की पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणावर महामार्गावर वाहने अडवून वाहनांची कागदपत्रे तपासली जातात कागदपत्रे नसल्यास त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जात आहे परंतु या कारवाई मध्ये काही ठराविक वाहनांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप काही वाहन चालकांकडून केला जात आहे
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पुणे नगर महामार्गावर वाघोली,लोणीकंद, सणसवाडी, कोरेगाव येथे मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे ही कारवाई सुरू असतानाच आरटीओ अधिकाऱ्यांच्या समोरच काही गाड्या क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करताना दिसतात मात्र त्यांच्याकडे ‘अर्थ’पूर्ण संबंधामुळे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वाहन चालक मालक करत आहेत.
पुणे नगर महामार्गावर वाघोली व लोणीकंद परिसरामध्ये हजारो डंपर मधून मोठ्या प्रमाणावर क्षमतेपेक्षा अधिक खडी डबर याची वाहतूक होत असते परंतु आरटीओचे अधिकारी याकडे का? दुर्लक्ष करतात हा देखील सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.