पुणे,दि.११:- आपला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेली की आपण पोलीस ठाण्यात त्याची तक्रार देतो.
पण ते परत मिळतील याची आशा आपल्याला नसते. असेच तब्बल २१ मोबाईल ज्यापैकी काही हरवले होते तर काही चोरीला गेले होते. पण हे मोबाईल आता पोलिसांकडे आहेत. आपले मोबाईल पोलिसांकडे पाहून मोबाईल फोनचे मालकही चक्रावले आहेत.पुणे शहर पोलिसांकडे २१ मोबाईल होते. लोणीकंद सायबर टिमने बरीच मेहनत घेतली. विविध पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील चोरल्या गेलेल्या आणि हरवलेल्या मोबाईलची यादी तयार केली.यात महागडे आणि अँड्रॉईड फोन होते. IMEI नंबरवरून हे मोबाईल ट्रेस करण्यात आले.२१ मोबाइल फोन ट्रेस झाले. मोबाईल फोन ट्रेस झाल्यानंतर त्यावर फोन करून ते लोणीकंद पोलीस ठाण्यात जमा करण्यात सांगण्यात आले होते.त्या मुळे काही लोकांनी मोबाईल स्वतः पोलीस ठाण्यात येऊन जमा केले. पोलिसांनी पुणे शहरातील अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल कलेक्ट केले. हे मोबाईल फोन त्यांच्या मालकांना परत देण्यात आले आहेत. पोलिसांनी हे मोबाईल त्यांच्या मालकांना परत केले आहेत.आपले मोबाईल पाहून मालकांनाही विश्वास बसत नव्हता. त्यांना आपला आनंदही व्यक्त करता येत नव्हता. पोलिसांच्या प्रयत्नामुळे या मालकांच्या चेहऱ्यावर मोबाईल परत मिळाल्याचा आनंद झळकला. त्यांनी पोलिसांचे आभार मानले. मोबाईलचे मालक म्हणाले, की त्यांना मोबाईल पुन्हा मिळेल याची आशा नव्हती. काही लोकांना तर त्यांना मोबाईल होता तसाच्या तसा मिळाला आहे.तसेच तांत्रिक विश्लेषण करुन विविध भागातुन एकुण २१ अॅप्पल, सॅमसंग, वन प्लस, व्हिवो, ओप्पो, रिअल मी, एम आय असे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन हस्तगत केले व ते तक्रारदार यांना मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०४ शशिकांत बोराटे यांचे हस्ते सुपुर्त केले. तक्रारदारांनी लोणीकंद सायबर तपास पथक यांचे आभार मानले…सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा पोलीस उप आयुक्त परीमंडळ – ०४ शशिकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग. किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशन वपोनि गजानन पवार पोनि गुन्हे मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोस्टे सायबर तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, सागर पाटील, महिला पोलीस अंमलदार किर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांनी केलेली आहे.