पुणे,दि. २०:- (वार्ताहर) : एनडीए ग्राउंडच्या बाजूला, एनडीए रोड, वारजे माळवाडी, येथिल अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकासोबत भाजीपाला विकणाऱ्या काही दाम्पत्याने मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. १९) रोजी घडली होती. या दाम्पत्याला मारहाणीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 1) नवनाथ बाळासाहेब वांजळे वय 32 वर्षे, धंदा भाजीपाला विक्री,2) रोहन मल्हारी माळशिखरे वय 18 वर्षे, चंदा भाजीपाला विक्री, 3) सुभाष मारुती बोडके वय 40 वर्षे, धंदा फळभाजी विक्री, 4) गणेश गोरबा हुंबरे वय 30 वर्षे, धंदा फळभाजी विक्री,व चार अनओळखी असे या दाम्पत्याचे नाव आहे.पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील.माधव जगताप,उप आयुक्त यांनी ही माहिती दिली.अतिक्रमण पथकातील अधिकारी अंकुश बादाडे हे पथकासह मंगळवारी (ता. १९) रोजी सायंकाळी ०५ वाजुन ४० मी एनडीए ग्राउंड जवळ आलो असता एनडीए जूला फुटपाथलगत रहदारीच्या रस्त्यावर बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी एनडीए जूला फुटपाथलगत दाम्पत्य पदपथ व रस्त्यावर फळे व भाजीपाला विकण्यासाठी बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पथकाने त्यांना त्याठिकाणी भाजी व फळे विक्री न करण्याबाबत समज दिली. मात्र, विक्रेत्यांनी ऐकले नाही. तेव्हा अतिक्रमणविरोधी पथकाने त्यांची फळे व भाजीपाला जप्त करून पिकअपमध्ये टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिथे असलेल्या भाजी ते यांनी कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंगावर मारण्यासाठी धाऊन गेला. तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. याचप्रमाणे फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर ५ ते १० फेरीवाल्यांनी विरोध केला होता. या प्रकरणात पोलिसांनी ५ ते १० पुरुष व महिला फेरीवाल्यांवर सरकारी कामात अडथळा आणून धमकावल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.