पुणे,दि.२९ :-पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती अनेक दिवसांपासून चिंताजनक होती. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार होते. आज दि.२९ रोजी सकाळ पासून प्रकृती अधिकच ढासळली. त्यांनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. पुणे महापालिकेत नगरसेवक ते खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.