पुणे,दि.०८:- पुणे शहरातील येरवडा येथे कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बेंगलोर यांच्यामध्ये चालू असलेल्या आयपील क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने जाळ्यात त्याच्याकडून सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला आहे. ही कारवाई येरवडा येथील गुंजन टॉकीज जवळ गुरुवारी (दि.6) केली. दरम्यान, पुण्यातील काही मोठे बुकी पुणे शहर पोलिसांच्या रडारवर आहेत. आकाश धरमपाल गोयल (वय 30 वर्षे रा. लोहगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचेन नाव आहे. पुणे शहर गुन्हे शाखेचे सुनील पवार, युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना माहिती मिळाली की, इंडियन प्रीमियर लीगच्या कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बेंगलोर यांच्यामध्ये चालू असलेल्या क्रिकेट मॅच वर आकाश गोयल हा सट्टा घेत आहे. आरोपीचा शोध घेत असताना त्याला येरवडा येतील गुंजन टॉकीज जवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता सट्टा घेऊन तो पुढे महादेव बुकी या क्रिकेट अॅप्लीकेशन मार्फत पुढे फिरवत असल्याची कबुली दिली.
तसेच आकाश धरमपाल गोयल व त्याचेकडे खेळणारे ०४ इसमांविरूध्द येरवडा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम १२ ( अ ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्याचेकडून सट्टा घेण्याकरीता वापरत असलेला मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आला आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे,पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस अंमलदार, संतोष क्षिरसागर, शरद वाकसे, सुजीत पवार, संजिव कळंबे, सतिश कत्राळे, राकेश टेकावडे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे.दाखल गुन्हयाचा पुढिल तपास संतोष क्षीरसागर, सहा. पोलीस उप-निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट-३, पुणे शहर हे करीत आहेत.