पुणे,दि.०९:-आयपीएलच्या मॅचेसवर सट्टा घेणार्या बुकींवर पुणे शहर गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात शनिवारी दि.8 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. त्यामध्ये तब्बल 9 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 कॉम्पयुटर, 3 लॅपटॉप, 18 मोबाईल हॅन्डसेट, 92 हजार रूपये रोख असा एकुण 5 लाख 12 हजार रूपयाचा सऐवज जप्त केला आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार सह आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सुनिल पवार आणि युनिट-3 चे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कोंढव्यातील एका फ्लॅट मध्ये काही बुकी आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरूध्द चेन्नई सुपर किंग या क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणावर सट्टा घेत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार आणि युनिट-3 चे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शखाली एसीपी सुनिल पवार, व.पो.नि. बहिरट, पोलिस उपनिरीक्षक पवार, पीएसआय पाटील आणि इतर कर्मचार्यांनी शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोंढव्यात छापा टाकला. त्यावेळी तेथे 9 जण आयपीएलच्या मॅचवर बेटिंग घेत असल्याचे आढळून आले.अटक आरोपींपैकी काहीजण हे LOTUS 365 या लिंकवर ID तयार करून खेळणार्या ग्राहकांना देत असल्याचे निदर्शनास आले. आरोपी हेमंत गांधी हा क्रिकेट लाईव्ह अॅपवर आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेत होता. त्याच्या खिशात 92 हजार रूपये मिळून आले. त्याच्याजवळ 1 लॅपटॉप, 5 मोबाईल हॅन्डसेट आढळले इतर जण हे LOTUS 365 चे ID तयार करून ग्राहकांना देण्याचे काम करत होते. त्यांच्याकडे 2 लॅपटॉप, 1 कॉम्प्युटर आणि 13 मोबाईल हॅन्डसेट होते. पोलिसांनी एकुण 5 लाख 12 हजार रूपये किंमतीचा 1 कॉम्प्युटर, 3 लॅपटॉप, 18 मोबाईल असा एकुण मिळून आला. आरोपींविरूध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.