पुणे,दि.२०:- पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग विना परवाना बोर्ड, बँनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किआँक्स यांचेवर दिनांक १९/०४/२०२३ रोजी परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत माधव जगताप, उप आयुक्त, परवाना व आकाशचिन्ह विभाग यांचे नियंत्रणाखाली १५ क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये तब्बल अनधिकृत आणि धोकादायक असलेले 21 होर्डींग्स समवेत 239 हून अधिक फ्लेक्स, बॅनर, बोर्डवर कारवाई करत ते काढले आहेत.
पुणे महानगरपालिकेचा परवाना आणि आकाशचिन्ह विभागाने अनधिकृत होर्डींगवर बुधवारी कारवाईचा बडगा उगारला. शहराच्या वेगवेगळ्या भागातील 21 होर्डींग्स समवेत 230 हून अधिक फ्लेक्स, बॅनर, बोर्ड महापालिकेच्या पथकांनी काढून टाकले. विनापरवाना जाहीरात होर्डींग व बोर्ड लावणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने गुन्हा दाखल केले आहे.
सदर कारवाई मध्ये ५ क्रेन, ४० बिगारी सेवक, ०६ गँस कटर, ५ वेल्डर, या यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करण्यात आला