पुणे,दि.३०:- पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 ने पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्यात ट्रॅव्हलसने ड्रग्ज घेऊन येणाऱ्या आरोपींना २ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.पुणे शहर गुन्हे शाखेच्या
अमली पदार्थ विरोधी १ पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली व. या घटनेत जवळपास २ कोटी २१ लाख ६० रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.आरोपी हे शनिवारी रतलाम येथून एमडी हे ड्रग्ज घेऊन ट्रॅव्हल्सने खराडी बस स्टॉपला उतरले.
आरोपी क्रमांक तीन हा तिथे त्यांची वाट पाहत थांबलेला होता. आरोपींची अंग झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक किलो 108 ग्रॅम एमडी हे ड्रग्ज आढळून आले. याची किंमत सुमारे २ कोटी २१ लाख ६० रुपयांचे ड्रग्ज मिळुन आली इसम नामे १) आजाद शेरजमान खान, वय ३५ वर्षे, रा. पिपलखेडी, ता. अलोट, जि. रतलाम, राज्य मध्य पद्रेश, थाना बरखेडाकला २) नागेश्वर रामेश्वर प्रजापती, वय ३५ वर्षे, रा. ता. अलोट, जि. रतलाम, राज्य मध्य पद्रेश, गाव खजुरी – देवडा, थाना, आलोट व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांचे ताब्यातुन त्यामध्ये ०१ किलो १०८ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने, त्यांचे विरुध्द चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – १ पुणे शहर, सुनिल पवार यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा. निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, योगेश मोहिते व संदेश काकडे यांनी केली आहे.