पिंपरी चिंचवड,दि.२५ :- पिंपरी चिंचवड येथील खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली. अटक केलेल्या दोघांकडून तीन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पिंपरी चिंचवड येथील
वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडे नगर येथे करण्यात आली.
सुनील बाळासाहेब खेंगरे (वय 38, रा. चिंचवडेनगर, चिंचवड), अभिजीत अशोक घेवारे (वय 35, रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहर परिसरात गोळीबार करून खून करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने याबाबत कारवाई करण्याचे गुन्हे शाखांना आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार चिंचवड परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार आशिष बोटके आणि प्रदीप गोडांबे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील केंद्रे आणि त्याच्या साथीदाराकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडेनगर येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 20 हजार 600 रुपये किमतीचे तीन देशी बनावटीचे पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली सदरची कारवाई विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त,वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्याभार खंडणी विरोधी पथक, तसेच खंडणी विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, सुनिल कानगुडे, किरण काटकर, व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहवा नागेश माळी यांचे पथकाने केली आहे.