धर्माबाद,दि.२५ :- नव्यानेच निर्माण झालेल्या व अतिशय गुळगुळीत झालेल्या महाराष्ट्र तेलंगाना सीमाराज्य रस्ता म्हणजेच बासरतीर्थ क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या कारच्या चालकांचा ताबा सुटल्यामुळे भीषण अपघात होऊन एक महिला ठार झाली असून तिघे गंभीर जखमी एकांची तब्येत अतिशय अत्यवस्थ असल्याचे प्राथमिक वृत आहे.
मुंबई पोलिसांमध्ये मुंब्रा येथे पी.एस.आय. असलेले सुरेश जाधव व परभणी येथे असलेल्या त्यांच्या पत्नी ए.पी.आय. कल्पना जाधव, यांच्यासह श्याम पवार व सुरेश जाधव यांच्या सासुबाई निर्मलाबाई राठोड हे बासर तीर्थक्षेत्रावर दर्शनासाठी जात होते. हा रस्ता नुकताच के.टी. कंन्स्ट्रक्शनने आद्ययावत केला असून गुळगुळीत रस्त्यावर वाहने भरधाव वेगाने जात आहेत.
तेलंगाना राज्यसीमेच्या अलीकडे आसलेल्या धाब्याच्या पलीकडे वळण रस्ता आहे. त्या वळण रस्त्यावर चालकांचा ताबा सुटल्यामुळे कार थेट दोन तीन पलटी खात शेतातील खड्यात जाऊन पडली. त्यामध्ये निर्मलाबाई राठोड ह्या जागीच ठार झाल्या असून सुरेश जाधव, कल्पना जाधव व शाम पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एक जण अत्यवस्थ असल्याने धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना नांदेडला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
धर्माबाद पोलीस जाय मोक्यावर जाऊन सदरील घटनेचा पंचनामा केला असला तरी त्यांच्या नातेवाईकांचा अद्याप पत्ता लागत नसल्यामुळे धर्माबाद पोलीस ठाण्यात वृत लिही पर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
सिध्देश्वर मठपती, धर्माबाद (प्रतिनिधी) –