दिल्ली,दि.१८:- मनसे प्रमुख राज ठाकरे याची दिल्ली दौऱ्यावर. आज ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहेत. या भेटीदरम्यान मनसेच्या महायुतीमधील सहभागावर चर्चा होणार आहे
दरम्यान मुंबईतील दक्षिण मुंबई हा लोकसभा मतदारसंघ मनसेसाठी सोडावा यासाठी राज ठाकरे आग्रही आहेत. यासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. जर मनसे महायुतीमध्ये सहभागी झाली तर मनसेकडून लोकसभेसाठी ठाकरे घराण्यातील उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांचे पूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राज ठाकरे हे कालपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते आज अमित शाह यांची भेट घेतली आहेत. मनसे महायुतीमध्ये सहभागी झाल्यास त्यांना लोकसभेची एक जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागेवर अमित ठाकरे हे निवडणूक लढवू शकतात अशी माहिती समोर येत आहे. अमित ठाकरे हे संभाव्य उमेदवार असल्याची माहिती समोर येत आहे.
बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा
दरम्यान दुसरीकडे मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं नाव देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे. त्याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून संकेत देण्यात आले आहेत. जर बाळा नांदगावकर खासदार झाले तर आम्हाला आनंदच होईल असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मनसे महायुतीसोबत जाणार का? मनसेला लोकसभेच्या किती जागा मिळणार? महायुतीमध्ये पक्ष सहभागी झाल्यास कोणाला उमेदवारी मिळणार हे आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे.