पुणे,दि.१९:- लोकसभा निवडणुकांची घोषणा शनिवारी (दि. 16) मार्च रोजी करण्यात आली आहे.
निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याचा आरोप शिवसेना पुणे शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे
यांनी केला आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाली की आदर्श आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहते. आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक कामांवर आणि उपक्रमांवर बंदी घालण्यात येते. आचारसंहितेचा भंग केल्यास थेट कारवाईलाही सामोरे जावे लागते. आता शिवसेना पुणे शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे
भाजपवर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुण्यात खळबळ उडाली आहे.
शिवसेना पुणे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शहराच्या वतीने करण्यात आला. याबाबत पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांना निवेदन देखील देण्यात आले.शिवसेनेच्या निवेदना नुसार स्वच्छ सर्वेक्षणात तसेच आत्ताच झालेल्या G20 परिषदेत पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील भिंती सुशोभीकरण केल्या होत्या. परंतू भारतीय जनता पक्षाच्या वतीने या आणि अनेक भिंतींवर राजकीय जाहिरातबाजी करुन शहरात विद्रुपीकरण केले आहे.
तसेच देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असूनही पुणे मनपा प्रशासन धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे. शहरात सर्रासपणे भाजप ने निवडणूक चिन्ह, मोदींच्या घोषणा, भाजप नेत्यांची नावे भिंतींवर लावली आहेत यातून शहर विद्रूपीकरणात अजुन हातभार लावला जात आहे.
मागील आठवड्यात शिवसेनेच्या वतीने आकाशचिन्ह व परवाना विभागाचे अधिकारी माधव जगताप यांना भेटून निवेदन दिले आहे.
या विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहराच्या वतीने पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. पुणे मनपा प्रशासने यावर तत्पर कारवाई करावी अन्यथा शिवसेनेला लोकशाही च्या रक्षणार्थ पुणे मनपा विरोधात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे स्पष्ट सांगण्यात आले .
आयुक्तांनीही आचारसंहितेची कारवाई चालू केली आहे आणि चुकीचे काम करणाऱ्यांवर आम्ही गुन्हा दाखल करू असे आश्वासन यावेळी दिले .
यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे , शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब ओसवाल, अविनाश साळवे, विशाल धनवडे , पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, उपशहर प्रमुख समीर तुपे , आनंद गोयल, प्रशांत राणे, उमेश वाघ, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, युवराज पारीख , गणेश काकडे, विभागप्रमुख अजय परदेशी, राजेश मोरे, राहुल जेकटे व शिवसैनिक उपस्थित होते .