पुणे,दि.२८:- पतीच्या मालमत्तेतील पतीचा हिस्सा, त्याच्याबरोबर आणखी १० कोटी रुपये द्या, नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. जेलमध्ये पाठविन, अशी सुनेने ज्येष्ठ नागरिक असलेल्या सासुला धमकाविल्याचा प्रकार बाणेर परिसरत समोर आला आहे.
याप्रकरणी बाणेर येथील एका ६४ वर्षांच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ४०८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुन व तिचे वडिल सुनिल जैन (वय ६३, रा. दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत चतुःश्रृंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे निधनानंतर सुने कडून तगादा लावला होता की
पतीच्या मालमत्तेतील पतीचा हिस्सा, त्याच्याबरोबर आणखी १० कोटी रुपये द्या, व तुमच्या मुलाचे निधन झाले आहे. फिर्यादी यांची सुन व तिचे वडिल फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादी यांना मुलीच्या नावावर प्लॉट करुन द्या नाही तर मी तुम्हाला सोडून जाईन व तुम्हाला जेलमध्ये पाठविन, अशी धमकी देत. फिर्यादीच्या मुलाचा हिस्सा देऊन त्याशिवाय १० कोटी रुपये द्या. नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही व तुझेवर व तुझ्या मुलावर केसेस टाकून जेलमध्ये पाठविन, अशी धमकी दिली.
फिर्यादी यांनी त्यांच्या सुनेकडे विश्वासाने ठेवायला दिलेले सोन्याचे व हिर्याचे दागिने त्यांच्या संमतीशिवाय घेऊन जाऊन अपहार केला असल्याचे फिर्याद दिली आहे त्यात म्हणले आहे. . पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे करीत आहेत.