• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महापारेषणची वीजवाहिनी तुटली; पर्यायी व्यवस्थेतून सुमारे ६५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
16/04/2024
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
Images (90)
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. १६ :-  महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही टॉवर लाइनची दोनपैकी एक वीजवाहिनी तुटल्याने पिरंगुट २२० केव्ही व हिंजवडी २२० केव्ही उपकेंद्रांचा व पर्यायाने महावितरणच्या २० वाहिन्यांचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. १६) सकाळी ९.१० वाजता बंद पडला होता. मात्र युद्धपातळीवर पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करून दुपारी १२.०५ ते ३.३६ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने भुकूम, भूगाव, पिरंगुट, कोळवण खोरे, मुठा खोरे आदी मुळशी तालुक्यातील परिसरातील ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, कोकणातील रोहा येथून महापारेषणच्या कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून टॉवर लाइनद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र कांदळगाव २२० केव्ही टॉवर लाइनची एक वीजवाहिनी आंबेगाव (ता. मुळशी) येथे मंगळवारी (दि. १६) सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास तुटली. त्यामुळे पिरंगुट व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. तर या उपकेंद्रांवर अवलंबून असलेले महावितरणच्या सुमारे २० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. यात ७० मेगावॅट विजेची पारषेण तूट निर्माण झाली. त्यामुळे मुळशी तालुक्यातील भूगाव, भूकूम पिरंगूट, बुरावडे, कोळवण खोरे, मुठा खोरे, पौड, माले, माण, मारूंजी, कासारसाई, नेरे, दत्तवाडी, हिंजवडीचा काही भागासह ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

सध्या तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढल्याने ७० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करणे आव्हानात्मक होते. मात्र महापारेषण व महावितरणने संयुक्तपणे युद्धपातळीवर प्रयत्न करून खंडित झालेल्या भागात दुपारी १२.०५ मिनिटांनी पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात सुरवात केली. दुपारी ३.३६ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच ४५ गावांतील ६५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान महापारेषणकडून तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या दुरूस्ती कामाला वेग देण्यात आला. यात आज दुपारी ३.२५ वाजता तुटलेल्या वीजवाहिनीचे दुरुस्ती काम पूर्ण झाले. त्यानंतर महापारेषणची कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली व त्याद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राचा वीजपुरवठा देखील पूर्ववत झाला.

Previous Post

कंटेंट क्रिएटर्सनी देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे – पुनीत बालन

Next Post

सूर्यदेवाने दिला रामलल्लांना आशीर्वाद, असा पार पडला अयोध्येतील ‘सूर्य-तिलक’ सोहळा;

Next Post
Screenshot 20240417 165148 Whatsapp

सूर्यदेवाने दिला रामलल्लांना आशीर्वाद, असा पार पडला अयोध्येतील 'सूर्य-तिलक' सोहळा;

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist