पुणे, दि. २४ :- पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे शहरातील १४ पोलिस स्टेशनच्या हद्दीत संयुक्त कारवाई करून बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे. यात एकूण ४२ पिस्तूल व ७४ जिवंत काडतुसे असा एकूण १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन २८ आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे युनिट तीनच्या पथकाने २१ मार्च रोजी केलेल्या कारवाईत प्रशांत मगम पवार (वय २८ रा. सिंहगड रोड पुणे) यांच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे एक किया कंपनीची कार जप्त करण्यात आली आहे. तर मेघराज उर्फ पप्पु लक्ष्मण दराडे (वय ३२ रा. अहमदनगर) यांच्या कडून चार पिस्तूल व १० काडतुसे तर समीर हरीभाऊ हरपुडे (वय ३२ रा. कोथरूड पुणे) यांच्या कडून एक पिस्तूल असा एकूण १९ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण २८ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान यात दिनांक १४ एप्रिल रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये तडीपार गुन्हेगार निखिल राजू शिरसाठ (वय २१ रा. धायरी पुणे) याला अटक करून सहा पिस्तूल १० काडतुसे मोपेड कोयता असा एकूण २ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दिनांक १५ एप्रिल रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तडीपार गुंड अश्विन बाळकृष्ण लोणारे (वय २० रा.धायरी पुणे) याला अटक करून तीन पिस्तूल व ६ काडतुसे जप्त करण्यात आली आहे. तसेच वैभव अनंता तरडे (वय २३ रा.धायरी पुणे) याच्याकडून ३ पिस्तूल व ६ काडतुसे असा एकूण २ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच २२ मार्च रोजी खंडणी विरोधी पथक एकने सुरज रोहिदास खंडागळे (वय ३० रा. वारजे पुणे) याला अटक करून एक पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहे
तसेच वैभव अनंता तरडे (वय २३ रा.धायरी पुणे) याच्याकडून ३ पिस्तूल व ६ काडतुसे असा एकूण २ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच २२ मार्च रोजी खंडणी विरोधी पथक एकने सुरज रोहिदास खंडागळे (वय ३० रा. वारजे पुणे) याला अटक करून एक पिस्तूल व दोन काडतुसे असा एकूण ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक २९ मार्च रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सागर गणेश सुतार (२३ रा. वारजे पुणे) याला अटक करून एक पिस्तूल व २ काडतुसे असा एकूण ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दिनांक १ एप्रिल रोजी खंडणी विरोधी पथक दोनने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन ५ पिस्तूल ११ काडतुसे जप्त केली आहे.व दिनांक ९ एप्रिल रोजी अजय उर्फ भज्या प्रकाश निकाळजे ( वय ३१ रा. कोंढवा बुद्रुक पुणे) याला अटक करून एक पिस्तूल व ३ काडतुसे असा एकूण २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दिनांक ४ एप्रिल रोजी गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ओमकार विनोद पवार (वय २५ रा. अप्पर बिबवेवाडी पुणे) याला ताब्यात घेऊन एक पिस्तूल व दोन काडतुसे असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे१ सुनिल तांबे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, श्रीहरी बहीरट, क्रांतीकुमार पाटील, नंदकुमार बिडवई व १४ पोलीस स्टेशनकडील अधिकारी व स्टाफने तसेच गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, कानिफनाथ कारखेले, महेंद्र कडू, संतोष क्षीरसागर, विजय कांबळे, प्रफुल चव्हाण, विनोद शिवले, अकबर शेख व उज्वल मोकाशी यांनी केलेली आहे.