पुणे,दि.३०:- पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून ६ महीनेच्या बालकांचे अपहरण करणाऱ्या आणि त्याला विकत घेणाऱ्यास पुणे शहरातील बंडगार्डन पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. या बालकाची विक्री दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावातील एकास तीन लाखाला करण्यात आली होती.
त्याच्या ताब्यातून बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
चंद्रशेखर मालकाप्पा नड्डगंड्डी ( २४, रा. जांबगी, जि. विजापूर, कर्नाटक), सुभाष पुतप्पा कांबळे ( ५५, रा. लवंगी, जि. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहे.
अपहरणाची घटना शुक्रवारी (दि. २७) रोजी घडली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
श्रावण अजय तेलंग(सात महिणे) असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव होते. याप्रकरणी त्याचे वडील अजय तेलंग यांनी तक्रार दिली होती. अजय तेलंग यांची आई येरवडा कारागृहात आहे. तेलंग दाम्पत्य मूळचे यवतमाळचे आहे. आईला भेटण्यासाठी तेलंग आणि त्याची पत्नी पुण्यात आले होते. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात तेलंग दाम्पत्य झोपले होते. त्यावेळी मुलगा श्रावण याला उचलून नेण्यात आले.
पोलिसांनी तातडीने तीन पथके तयार करुन पुणे स्टेशन परिसरातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. यामध्ये गुन्ह्यात कारचा वापर आणि एकापेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता दिसली. तर तांत्रिक विश्लेषणात आरोपी विजापूर (कर्नाटक) येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते पोलिसांनी विजापूर येथे
सापळा रचून चंद्रशेखर नड्डगंड्डी याला ताब्यात घेतले नड्डगंड्डी याने गुन्ह्याची कबुली देत ४ साथीदारांच्या मदतीने पुणे स्थानकातून अपहरण केल्याचे सांगीतले तसेच बालक ३ लाख रुपयांना सुभाष कांबळेला विकलयाचे सांगितले. यानंतर पोलिसांनी विजापूर येथील एका हॉटेलमधून आरोपी सुभाष कांबळेला बालकासह ताब्यात घेतले.
बालकाचा शोध घेणाऱ्या पुणे शहर बंड गार्डन पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रोख एक लाख रुपये बक्षिस देवुन पथकाचा गौरव केला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, सहा पोलीस आयुक्त लष्कर विभाग, संजय सुर्वे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निबांळकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदिप मधाले, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पोउपनि चेतन धनवडे, पोलीस अंमलदार सुधीर घोटकुले, ज्ञानेश्वर बडे, सागर घोरपडे, मंगेश बोराडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजु धुलगुडे, विलास केकान यांचे पथकाने केली.