पुणे,दि.२२ : – पुणे शहरातील कल्याणी नगर येथे झालेल्या भीषण अपघातीतील अल्पवयीन मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल याला पुणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यानंतर त्यांना आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना आज पुणे पोलिसांकडून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तीवाद ऐकून विशाल अग्रवाल याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.