पुणे,दि.२३:- शिंदवणे गाव हद्दीत कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून नवीन बेबी कालव्याच्या लोखंडी कठडा तोडून कार गाडी पाण्यात बुडाली आहे. या अपघातात एकाच्या मृत्यू झाला आहे तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत.
हा अपघात गुरुवारी (दि.२३) सकाळी सहाच्या सुमारास घडला आहे.
अमर साहेबराव घाडगे (वय २८ रा.जुन्नर) या कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गणेश संजय थोरात (वय २२) व शुभम शंकर इंगोले (वय २१) रा.दोघेही केसनंद ता. हवेली व आदित्य महादेव तावरे (वय २०रा.जुन्नर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
फलटण येथील बाजार असल्याने चौघेजण कार मधून निघाले होते. शिंदवणे गावाच्या हद्दीत असलेल्या कालव्यावर आले असता कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट कालव्यात पाण्यात कोसळली. यामध्ये कार चालकाचा मृत्यू झाला आहे.