पुणे,दि.२६:- पुणे शहर पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून पब व बार वर कारवाई करण्याचे सत्र सुरु केले आहे
कल्याणी नगर मधील बॉलर या पबवर दोन दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दोन दिवसांनी पाहणी केली असता नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने राज्य उत्पादन शुल्क या विभागाकडून थेट बॉलर या पबला टाळे ठोकण्यात आले असून परमिट रुमचाही परवाना रद्द केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क ‘अ’ विभागाने केली.
बॉलर पबवर गुन्हा दाखल केल्यानंतर नियमांचे पालन जात नसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या पबवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वसंत कौसडीकर, उपनिरीक्षक रोहित माने, विरेंद्र चौधरी, पोलीस कर्मचारी श्रीधर टाकाळकर, विकास घोलेकर, शिवाजी शिंदे, मासाळकर, पाचारणे याच्या पथकाने शनिवारी रात्री बॉलर पबवर कारवाई केली.
कौसडीकर म्हणाले की, ”कल्याणीनगर मधील पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येते. नेहमीप्रमाणे करण्यात येणाऱ्या कारवाई प्रमाणेच ही कारवाई होती. बॉलर पबवर दोन दिवासांपूर्वी विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले होते. मात्र पाहणी केली असता पबमध्ये नेहमीप्रमाणे धांगडधिंगाणा सुरूच होता. त्यामुळे विभागाच्या पथकाने पबमध्ये जावून उच्च आवाजात सुरु असलेली गाणे बंद केले. पबला दिलेल्या परवान्यानुसार जेवढा परवाना दिला आहे, त्याच ठिकाणी मद्य विक्री करणे आपेक्षित होते. मात्र पबच्या इतर ठिकाणी देखील मद्यविक्री सुरु असल्याचे दिसून आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्यासाठी ठेवण्यात आलेल्या नोंदवहित पब चालकाकडून नोंदी ठेवण्यात अनियमतता दिसून आली. विक्री केलेल्या मद्याच्या एक अन एक बॉलची माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोणत्याच नोंदी केल्याचे यामध्ये दिसून आले
नाही. ताकीद दिल्यानंतर तसेच गुन्हा दाखल करुन ही नियम पाळण्यात आले नसल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाना आणि अधीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बॉलर पबला सील करण्यात आले आहे.”