पुणे,दि.०९:-पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.आज (दि.९) ते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा समाज तसेच विरोधकांनी पश्चिम महाराष्ट्रात मिळवलेले स्थान लक्षात घेत मुरलीधऱ मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून आज (दि.९) सकाळी संपर्क साधण्यात आला. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा पुण्यातील आणि परिसरातील राजकीय क्षेत्रावर चांगल्या पद्धतीने पडणार आहे असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.