पुणे,दि,२१:- केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे आणि येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे यांच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय योग दिन पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे 500 हून अधिक बंदिवान जनांनी योगाची प्रात्यक्षिके करत या उपक्रमाला जोरदार
याप्रसंगी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाल, केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे प्रादेशिक कार्यालयाचे उप-संचालक निखिल देशमुख, व्यवस्थापक डॉ. जितेंद्र पानपाटील, कारागृह उपअधीक्षक भाईदास ढोले, रविंद्र गायकवाड, मंगेश जगताप, पांडुरंग भुसारे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंद कांदे, आणि कारागृह जनसंपर्क अधिकारी योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला केंद्रीय संचार ब्यूरोमधील विभागीय कलाकारांनी बंदिवान जनांसमोर कथ्थक नृत्य तसेच योग संदर्भात प्रबोधनपर गीतांचे सादरीकरण केले. यानंतर पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे योग तज्ज्ञ डॉ. अजिंक्य पवार आणि निखिल पोळ यांनी योगाचे महत्व सांगत उपस्थित बंदिवान जनांकडून योगाची प्रात्यक्षिके करवून घेतली.
बंदिजनांना योग आणि योग दिवस यांच्यासंदर्भात मार्गदर्शन करताना येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाल म्हणाले, योग हा व्यायामाचा एक प्रभावशाली प्रकार आहे, ज्याच्या माध्यमातून केवळ शारिरीक आरोग्य सुधारते असे नाही, तर मनाचे संतुलन राखता येते. कारागृहाच्या आत चार भिंतीमध्ये राहत असलेल्या बंदीजनांना शरीर निरोगी राखण्यासह, शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी दैनंदिन योगाभ्यास खूप महत्वपूर्ण आहे.
यानंतर, केंद्रीय संचार ब्यूरोचे उपसंचालक निखिल देशमुख यांनी त्यांच्या विभागाची बंदिवान जनांना ओळख करून दिली. विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहितीही त्यांनी सर्वांना दिली. योगाचे महत्त्व समजावून सांगताना ते म्हणाले की योग विविध आजारांवर नियत्रंण मिळविण्यासाठी आणि निरंतर निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाचे आहे.