पुणे,दि.२७:- पुणे शहर पोलीस आयुक्त यांना अवैध व्यावसाय करणाऱ्यांना गुंडांना दम दिला आहे अंत पाहू नका… सुरुवातीला हात जोडू पण संयम तुटला तर कडक कारवाई करु असा दम पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय.
आमची दादागिरी काय असते ते तुम्हाला दाखवू असा इशारा अवैध व्यावसाय करणाऱ्यांना व गुंडांना दिला आहे. गेल्या काही दिवसात ड्रग्ज प्रकरण, अनाधिकृत पब, अवैध धंदे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमितेश कुमारांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुण्यातील नागरी संवादाचे आयोजन केले होते. सामाजित सलोखा, वाढती बाल गुन्हेगारी, वाढती व्यसनाधीनता आणि कायदा सुव्यवस्तेबाबत आयुक्तांनी संवाद साधला. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवैघ धंदा करणाऱ्यांना तंबी दिली आहे. मारहाण करणे त्याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. पुणे पोलिसांचा संयम तुटला तर कडक कारवाई करण्यात येईल. येरवड्यात आंतर्धमीय विवाहवरून झालेला खून यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अमितेश कुमार बोलत होते. गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत .
पुण्यातील नामचीन गुंडांचे किंवा त्यांच्या भाईंच्या नावाने अनेक अकाउंट बनवले आहेत आणि याच अकाउंटवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्या ही गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत असल्याच्या पोस्ट किंवा व्हिडीओ दिसले तर ते अकाउंट तर सस्पेंड होईलच पण ते चालवणारे तरुणांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.