पुणे,दि.१८ :- पुणे शहरातील वानवडी परिसरात दहशत माजविणार्या सराईत गुन्हेगारांना पुणे शहर पोलीस आयुक्त यांचा दणका एमपीडीए कायद्यान्वये कारवाई ! मतीन हकीम सैय्यद. रामनगर, हडपसर, पुणे एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे. त्याला वर्षभराकरिता नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे पुणे शहर पोलिस आयुक्तांची ही 58 वी एमपीडीए अन्वये कारवाई आहे.
मतीन हकीम सैय्यद हा त्याच्या साथीदारांसह वानवडी आणि हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत जीवघेण्या घातक हत्यारांसह गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा, बेकायदेशीर अग्नीशस्त्र व हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याच्याविरूध्द ८ गुन्हे दाखल आहेत.
सराईत गुन्हेगार मतीन हकीम सैय्यदच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी सैय्यद याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई व्हावी यासाठी प्रस्ताव पाठविला होता. गुन्हे शाखेतील पीसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद खोबरे यांनी प्रस्तावाची छानणी केली. त्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सैय्यद याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्याला १ वर्षासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत तब्बल ५८ सराईत गुन्हेगारांना स्थानबध्द केले
असून त्यांच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाया केलेल्या आहेत.