पुणे, दि. ४ : गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांची पूर्व तपासणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आळंदी रोड चाचणी मैदान येथील टेस्ट ट्रॅकवर १३ सप्टेंबर पर्यंत करण्यात येणार आहे; संबंधितांनी आपल्या वाहनांची तांत्रिक तपासणी करून प्रमाणित करून घ्यावे.
वाहनांतील तांत्रिक दोषामुळे अपघात होऊ नयेत, वाहने रस्त्यात बंद पडून वाहतूकीस अडथळा होऊ नये याकरीता उपाययोजना म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. वाहन तपासणीच्यावेळी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, लायसन्स व मुदतीतील वाहतूक परवाना आदी कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.