कोथरूड, दि. २८ – तेली सेनाच्या वतीने नुकतात राज्यस्तरीय वधू- वर पालक परिचय मेळावा पार पडला. या मेळाव्यात ३०० वधू- वरांनी भाग घेतला होता. या वेळी श्री संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश भोज, व उदघाटक संताजी महाराज जगनाडे संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे आणि वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे उपस्थित होते. या वेळी वसुंधरा उबाळे यांनी मुलींनी अपेक्षाच
ओझे कमी करावे, असा संदेश दिला. श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडचे अध्यक्ष रमेश भोज, सुभाष देशमाने, मधुकर गुरुवाडे, नारायणराव पिंगळे, सुधाकर लोखंडे, विठ्ठल गुलाने, धनंजय वाटरकर, जीवन येवले, अशोक तांबे आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनीता पवार, रंजना बागुल यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हरीश देशमाने यांनी, तर प्रास्ताविक गणेश पवार यांनी केले.