*प्रेस नोट*
५५ हजार अथर्वशीर्ष पठणातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना सारसबाग गणपती मंदिरात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे, दि. २२ :-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून पुण्यातील सारसबाग गणपती मंदिरात एक विशेष धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात २२१ ब्रह्मवृंदांच्या सहभागातून ५५ हजार वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.
सकाळी ७ ते १० या वेळेत पार पडलेल्या या भक्तिपूर्ण कार्यक्रमात पुणेकर भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कार्यक्रमाचे आयोजन कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व यशस्वी वाटचालीसाठी श्री गणरायाच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्याचा हेतू या कार्यक्रमामागे होता.या वेळी आमदार हेमंत रासने म्हणाले,“मा. देवेंद्र फडणवीस हे विकासाभिमुख दृष्टिकोन असलेले, जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्य करणारे नेतृत्व आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणेकरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.”
संकटाच्या काळात खंबीरपणे निर्णय घेणारे, सर्वसामान्य जनतेचा विश्वास जिंकणारे हे व्यक्तिमत्त्व आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि ते अशीच यशस्वी वाटचाल करत राहावीत, यासाठी श्री गणरायाच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्याचा हा एक छोटासा, पण मनापासून केलेला प्रयत्न होता. असे रासने यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजपचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. साधेपणा, भक्तिभाव आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असा हा सोहळा सर्व सहभागींसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
*देवाभाऊंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांमधून..!*
लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त “महासंकल्प” रक्तदान शिबिर तसेच वैद्यकीय सहाय्यता हेल्प डेस्क यांचा शुभारंभ आजकरण्यात आला. याशिवाय तीन ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले . या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १०७ रक्तपिशव्यांचे संकलन यातून करण्यात आले.
याशिवाय आयुष्यमान भारत योजना, पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधी, पुणे महानगरपालिका वैद्यकीय योजना इ. सरकारी आरोग्य योजनांसाठी हेल्प डेस्कचे उद्घाटन देखील करण्यात आले. उद्घाटन डॉ. ओमप्रकाशजी शेटे (अध्यक्ष, आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते पार पडले. या उपक्रमांचा उद्देश गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीचे योग्य मार्गदर्शन मिळवून देणे आणि सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. या शिवाय २२ क्रोनिक्स स्पॉटचे देखील सुशोभीकरण करून लोकार्पण करण्यात आले आहे.