पुणे, दि. १४ : -सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०१९ साठी दि. १० मार्चपासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुणे शहरात व पुणे जिल्ह्यात आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे. सार्वजनिक मालमत्तेवरील प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातींचे फलक, पोस्टर, बॅनर आणि झेंडे आज दि,१४ रोजी शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालये यांनी पुणे विद्यापीठ चौकात रोडचे डायरेक्शन असलेल्या बोर्ड वर नगरसेवकांचे नाव असलेल्या बोर्ड वर चिकट पट्टी लावून नाव बुजवण्यात आली आहे तसेच भिंतीवर असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ जाहिरातीवर असलेल्या नगरसेवकांच नावे ही बुजवण्यात आली आहे . तर, खाजगी मालमत्तेवरील फलक, पोस्टर,बॅनर आणि झेंडे हटविण्यात आले आहेत.
आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण करण्यासाठी भरारी पथक,स्टॅटिक सर्विलन्स टीम, व्हिडीओ सर्विलन्स टीम आणि व्हिडीओ व्हिवींग टीम विधानसभा मतदारसंघ निहाय स्थापित करण्यात आलेल्या आहेत. नवीन मतदार नोंदणीबाबत माहिती आवश्यक असल्यास तसेच आचारसंहितेचा भंग किंवा निवडणुकीच्या खर्चासंबंधी तक्रारीबाबत पुणे जिल्ह्यासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १९५० कार्यान्वित करण्यात आलेला आहे.