पुणे दि, २८ : – प्रतिनिधी सचिन काळे– मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दि,२८ रोजी (मुंबई वाहिनीवर) कि.मी. १०/७५० वर कमान बसविण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याने पुणे-मुंबई वाहिनीवरील वाहतूक (मुंबईकडे जाणारी) दि. २८ मार्च रोजी दुपारी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. मुंबईकडे जाणार्या प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन राज्य वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. काही काळासाठी मुंबईकडे जाणार्या प्रवाशांची तारांबळ होणार आहे
प्रवाशी वाहनांसाठी असा असणार पर्यायी मार्ग :- खालापूर टोल – खालापूर गांव – खालापूर फाटा – (एनएच ०४) मार्ग चौक फाटा – दौंड फाटा – शेडूंग टोल – अजिवळी फाटा – परत पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर. सर्व प्रवासी वाहन चालकांनी पर्यायी मागाचा वापर करावा तसेच सदरील कालावधीत अवजड मालवाहु वाहनांना द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलचे मागे (फुडमॉल जवळ) थांबवुन ठेवण्यात येणार आहे.
नेमके कुठे बसविण्यात येणार आहे कमान :- पुण्याकडून मुंबईकडे जाताना पनवेल एक्झीटच्या (बोगदा संपतो तिथे) जवळ असलेल्या धाटणच्या ठिकाणी कमान बसविण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासाचा मेगा ब्लॉक असणार आहे अशी माहिती राज्य महामार्ग पोलिस विभागातील मुख्यालयातील पोलिस अधीक्षक विजय पाटील यांनी दिली आहे.
प्रतिनिधी संकेत काळे