पुणे, दि. ८: – आज महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दि.८ दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.
विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या संकेत स्थळांवर भेट द्यावी. तसेच www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होणार आहे. हा निकाल एसएमएसद्वारे देखील प्राप्त करता येणार आहे. त्यासाठी Bsnl द्वारे MHSSC <space> <seatno> हा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवा, अशी माहिती महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.