.मुंबई दि,१८ :- महाराष्ट्राचे वित्त मंत्री सुधीरभाऊ मुंगूनटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारासाठी एकूण 25 कोटी रु ची तरतूद केली आहे , या पूर्वी वित्तमंत्री सुधीरभाऊ यांनीच पुढाकार घेऊन पत्रकारांच्या बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी 15 कोटी रुपये ची तरतूद केली होती , आजच्या अर्थसंकल्पात त्यामध्ये वाढ करून अधिक 10 कोटी रु ची तरतूद केली असून या योजनेसाठी आता एकूण 25 कोटी रु ठेवण्यात आले आहेत.
वित्तमंत्री सुधीर मुंगूनटीवार यांच्या या निर्णया बद्दल मराठी पत्रकार परिषदेचे नेते एस एम देशमुख , परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा , सरचिटणीस अनिल महाजन ,चंद्रपूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू भाऊ लडके , अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब ,सरचिटणीस प्रमोद लाजूरकर यांच्यासाह सर्वांनी अभिनंदन केले आहे.
शासनाने आता बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी व सर्व पात्र ज्येष्ठ पत्रकारांना या योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषद , व संलग्नित 35 जिल्हा पत्रकार संघांनी केली आहे