पुणे,दि. २५ :- संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे आज महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. इनामदार वाडा येथून मुक्काम हलवून पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ झाली. यावेळी वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पदमनाभन आदींसह संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.