पुणे दि, २७ :- पुणे वारजे येथ सर्व्हिस रोड लगत असलेल्या पृथक बराटे उद्यानालगत अनधिकृत व बेकायदेशीर पद्धतीने राजरोसपणे भेसळयुक्त ताडी विक्री सुरु होती. बुधवारी ताडी विक्री जाऊन काही स्थानिक कार्यकर्ते व नगरसेविका यांनी भेसळयुक्त ताडी जमिनीवर ओतून नष्ट करण्यात आली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरात सुरु असलेल्या ताडी विक्री संदर्भात गेले काही दिवस स्थानिक रहिवाशांबद्दल नाराजी होतो. त्यांनी हे दुकान बंद करण्याबाबत पोलिसांना वेळोवेळी निवेदन दिले होते.परंतु, पोलिसांकडून कुठल्याही हे प्रकरण गांभीर्याने घेतले जात नसल्याने या भागातील नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या उपस्थित मंगळवारी रस्त्यावर ताडी ओतून नष्ट करण्यात आली. या कारवाईत अंदाजे ४०० ते ५०० बाटल्या भेसळ युक्त आढळली. ताडी विक्री दुकानातील कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या उद्यानाच्या प्रवेशद्वारा समोरील रस्त्यावरच बेकायदा ताडी विक्री केली जात होती. याबाबत नागरिकांच्या मागणीवरून मागील आठवडाभर आम्ही तक्रार करूनही पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे मंगळवारी आम्ही ताडी रस्त्यावर ओतून देत नष्ट केली. लक्ष्मी दुधाने, नगरसेविका वारजे पोलीस यांनी सांगितले कि एका आठवड्यात (ता. १९ व ता.२५) या तारखेला व्यावसायिकावर दोनदा कारवाई करून गुन्हा दाखल करत त्यास कोर्टासमोर उभे करण्यात आले आहे. त्यामुळे कारवाई न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कालही माहिती मिळाल्यावर आरोपी नामे जितेंद्र नरसिंग सारंगे व अशोक भंडारी (दोघे रा. धनकवडी) यांना अटक करून न्यायालयात सादर करण्यात आले. प्रकाश खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे पोलीस ठाणे यांनी सांगितले