मुंबई दि,१०:- : पावसाळा सुरू झाला की सर्वात प्रथम लक्ष जाते ते आपल्या मोबाईल वर पावसाळ्यात त्याची कशी काळजी करायची या संदर्भात त्याच्या अनेक सुरक्षेविषयी समस्या आपणास भेडसावत असतात. मग आपण प्लॅस्टिक पिशवी वापरतो पावसातून फिरताना मोबाईल कमीतकमी वापरणे. कधीकधी आपण त्याच्या बाह्य भागावर लॅमिनेशन देखील करतो पण एखादा मुसळधार पावसामुळे किंवा अचानक आलेल्या सरी मध्ये मोबाईलही भिजून जातो मग आपल्याला चिंता लागते आता काय करायचे असे अनेक प्रश्न भेडसावत असतात.
तुमचा मोबाइल पाण्यात भिजल्याने बंद पडला तर मोबाईल तांदूळ असलेल्या भरणीत ठेवा. तांदूळ मोबाईल वरील पाणी पूर्ण पणे शोषून घेतो. साधारण २४ तासात तुमचा मोबाईल कोरडा होतो. त्यानंतर ही तो सुरू नाही झाला तर काही तास तो परत बरणीत तसाच ठेवावा
जर तुम्हाला तांदळ पेक्षा जलद प्रक्रिया हवी असल्यास सिलिका जेलचा वापर करू शकतो सिलिका जेलचे पॅकिंग अनेक नव्या वस्तू मध्ये आढळते नव्या पाकीट बंद वस्तू मध्ये निर्माण होणारे बाष्प शोषून घेण्याचे काम सिलिका जेल करतात.
खालील प्रकारे कृती करा
मोबाइल मध्ये पाणी गेल्यास मोबाईल बंद करा आणि उभा ठेवा सिम कार्ड आणि एस डी कार्ड बाहेर काढून ठेवा.
तुमच्या मोबाईल मधील बॅटरी वेगळी करता येणारी असेल तर वेगळी करावी अन्यथा बॅटरी मोबाईल मध्ये फिक्स असेल तर त्यांची बॅटरी काढण्याचा प्रयत्न करू नये.
कोरड्या कपड्याने किंवा कागदी टिशु पेपरने फोन पुसून घ्या पुसताना मोबाइलवरील पाणी अलगद टिपा. घाईने किंवा रगडून मोबाईल पुसण्याचा प्रयत्नात मोबाईलच्या स्क्रीनवर ओरखडे निर्माण होण्याची किंवा पाणी आतल्या भागात शिरण्याची शक्यता असते.
मोबाईल फोन कोरडा करण्यासाठीचे विशेष पाउच बाजारात मिळतात त्यांची मदत घ्या.
मोबाइल संपूर्ण कोरडा झाल्याशिवाय सिम कार्ड किंवा मेमरी कार्ड बॅटरी टाकू नये आणि तो लगेच चार्ज करू नये.
कोरडा झालेला फोन सुरु केल्यानंतर स्क्रीन, आवाजाची बटणे, चार्जिंग पोर्ट, तपासून पाहा कॅमेरा, स्पिकर यांचीही चाचणी घ्या
मोबाईल चे जेवढे पार्ट अलग करता येतील तेवढे करावेत व त्यावर हवेच्या मशीनने हवा मारावी अन्यथा पंख्याखाली सुकण्या करिता ठेवावा
बाळू राऊत प्रतिनिधी