पुणे दि११ : – पुण्यातील धनकवडी परिसरात पुणे सातारा रस्त्यावर बालाजीनगर येथे- रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्या पेटवून देण्याचा प्रकार घडला असून त्यात ७ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. पुणे सातारा रोडवरील बालाजीनगर येथील एॅलोरा पॅलेस येथे पहाटे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.याबाबत अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, बालाजीनगर येथे गाड्यांना आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला पहाटे २ वाजून ४२ मिनिटांनी मिळाली. त्यानंतर कात्रज येथील गाडी तातडीने घटनास्थळी पोहचली. जवानांनी काही मिनिटातच ही आग विझविली.तोपर्यंत तेथे रस्त्याच्या कडेला लावलेल्या ६ गाड्या जाळल्या. तर एका दुचाकीला आगीची झळ बसली होती.या गाड्यांच्या आगीच्या ज्वाला इतक्या मोठ्या होत्या की, त्या ठिकाणाहून वरच्या बाजूने गेलेल्या वायरीही जळून खाली लोंबकळत होत्या. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.