बोरघर दि,१० :- बोरघर / माणगांव सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच मौलिक योगदान देणाऱ्या बहुजन हितकारिणी सभा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे या वर्षी माणगांव आणि महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा जुनें माणगांव ( कुंभार वाडा ), हरकोल कोंड, हरकोल बौद्ध वाडी, तर महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा केंबुर्ली इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांना उपरोक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
.सोमवार दिनांक आठ जुलै रोजी बहुजन हितकारिणी सभा या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. रविंद्र जाधव, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री. किशोर शिर्के, सचिव श्री. मंगेश पवार, कार्यालय प्रमुख जयराम जाधव, माणगांव तालुका महिला अध्यक्ष अनिता महाडिक, इंदापूर विभाग अध्यक्ष अजय राजभर इत्यादी पदाधिकारी आणि सदस्य यांनी माणगांव आणि महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या उपरोक्त शाळांमध्ये जाऊन त्या त्या शाळेतील शिक्षकांच्या समवेत सर्व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
( विश्वास गायकवाड )