निरा .नरसिंहपुर दि,११:- इंदापूर तालुक्यातील सेतू सुविधा केंद्रात चाललेला भोंगळ कारभार व त्यामुळे जनतेला होत असलेला नाहक त्रास यामुळे समस्त नागरिकांना ज्ञाय मिळावा या साठी दीपक आण्णा काटे संस्थापक अध्यक्ष शिव सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे सोमवार दिनांक १५- ९ -२०१९ रोजी इंदापूर तहसील पुढे आमरण उपोषण करण्यात येणार आहे.या आधी दीपक काटे यांनी इंदापूर सेतू मंध्ये भेट देऊन सेतू चालकांना समज दिली होती परंतु त्याला न जुमानता सेतू मध्ये ये रे माझ्या मागल्या या म्हणी प्रमाणे जैसे थे परिस्थिती असल्याचे दिसून आले.याआधी दिनांक २७ -६-२०१९ रोजी नायब तहसीलदार सोपान हागारे यांच्या कडे यासंदर्भात निवेदन दिले त्यावर त्यांनी इंदापूर च्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या सोबत चर्चा करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले परंतु दाखल्यासाठी अतिरिक्त पैसे घेणे तसेच उर्मट भाषेचा वापर यामध्ये काहीच फरक पडला नाही .ही गोष्ट लक्षात आल्यामुळे शिवसरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे ४-७-२०१९ला उपोषणाचा इशारा दिला होता परंतु इंदापूरचे पोलीस निरीक्षक पवार साहेबांना निवेदन देण्यासाठी गेल्यावर त्यांनी ५ तारखेला इंदापूर मध्ये पालखी येणार असल्यामुळे उपोषणाची तारीख पुढे घेण्यास सांगितली.त्या मुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपोषण दिनांक १५-७-२०१९ रोजी करण्याचे ठरवले.यासंदर्भात दि.९ -७-२०१९ रोजी दीपक काटे यांनी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन दिले.व १५ तारखेला इंदापूर तहसील समोर उपोषण करणार असल्याचे सांगितले.तसेच इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये यासंदर्भात निवेदन देण्यात आले.या वेळेस शिवसरकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आण्णा काटे, उपाध्यक्ष किशोर घोलप, सचिव रवी नगरकर,संतोष मोरे,आमिर पठाण,मच्छिंद्र तिगारे, मंथन पवार, आकाश पेटकर, जयदीप बोंन्द्रे तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.त्यामुळे दि.२७ रोजी निवेदन देऊन सुद्धा आज १३ दिवस उलटूनही त्यांच्यामध्ये कोणतीच सुधारणा नसल्यामुळे इंदापूर मधील जनतेमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी दीपक आण्णा काटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जशे लोकमान्य टिळकांनी सांगितले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या प्रमाणे आजकाल सर्व कार्यालयात पैसे खाणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी परिस्थिती आहे.त्यामुळे अगदी पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातोय टेबलाखालच्या लाचेवर.हे आम्ही कधीही सहन करणार नाही व जिथे आन्याय होईल तिथे शिवसरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य नागरिकांच्या मागे ठाम पणे उभी राहिल.कारण आन्याय करणार्यापेक्षा आन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो.तसेच हा लढा माझा एकट्याचा नसून आपल्या सर्वांचा असून आपल्या न्याय हाक्कासाठी आपण सर्वजण एकत्र येवून भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवू असे सांगून जनतेला या लढ्यात सामील होण्यासाठी आव्हान केले.
प्रतिनिधी :- बाळा साहेब सुतार