भातकुली १३ :- ग्रामिण भागात राहणार्या एका युवतीचा शहरातील भररस्त्यात चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची थरारक घटना गोपालनगर मंगल कार्यालयासमोर एका बोळीमध्ये घडली. अर्पिता दत्ता ठाकरे (१९) असे मृत युवतीचे नाव असून ती भातकुली तालुक्यातील कवठा बहाळे येथील रहिवासी आहे. तुषार किरण मसकरे (२०, मलकापूर, भातकुली) असे तिची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.या घटनेबाबत पोलीस आयुक्त संजय बावीस्कर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अर्पिता ठाकरे व तुषार मसकरे यांची जुनी ओळख असल्याचे सांगितले. आरोपी व अर्पिता यांना विवाह करायचा होता परंतु दोघेही सज्ञान नसल्याने त्यांनी एका मंदिरात विवाह केला होता. आरोपीने तुषार याने अर्पिताच्या वडिलांकडे अर्पितासाठी मागणी घातली होती. परंतु त्याला त्यांनी विरोध केला. त्याच्या मोबाईलमध्ये अर्पिताचे काही फोटो देखील होते. याप्रकरणी युवतीने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी तुषार याला समज दिली. यावेळी तुषारने आपण यापुढे अर्पिता हिला त्रास देणार नाही असे लिहून दिले होते. त्याच्या मोबाईलमध्ये असणारे फोटो देखील डिलीट केले होते. परंतु त्यानंतर आज मात्र त्याने अर्पिता हिचा भररस्त्यातून खून केला.
प्रतिनिधी -कमलेश नवले,नेवासा