पुणे, दि. २०:- पुणे शहरात पुणे पोलिसांनी वरिष्ठांकडून अवैध धंद्यावर कारवाई करणेसाठी आदेश पालण करून पुणे शहरात काही ठिकाणी व फरासखाना पोलीस ठाणेचे अंतर्गत युनिट १ कडील अधिकारी व कर्मचारी यांनी दि. १८ जुलै रोजी पेट्रोलींग साठी फिरत असतांना त्वाष्टाकासार मंडळ, कसबापेठ, पुणे येथील इमारतीच्या जिन्यालगत अवैधरीत्या क्लब चालू असलेबाबत पेट्रोलींग करत असताना पोलिसांना आढळून आले व पेट्रोलींग करत असणाऱ्या पोलिसांनी वरिष्ठांना सांगितले कि त्या ठिकाणी पत्त्याचा क्लब चालू आहे ववरिष्ठांना कारवाई करण्याच्या सुचना पुणे शहरातील पोलिस वरिष्ठांकडून मिळाल्या . त्या ठिकाणी स्टाफसह जावून, इमारतीच्या जिन्या शेजारी मोकळ्या जागेत ५ ते ६ इसम खाली गोलाकार बसून पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे दिसले. व अचानक पोलिसांनी छापा टाकून ६ इसमांना जागीच ताब्यात घेवून त्यांचे नांव पत्ता विचारता, १) सुशांत निजामपूरकर, रा. कसबा पेठ, पुणे २) अब्दुल अन्सारी, रा. लमाणवस्ती, येरवडा, ३) सेवा पंडीत, रा. येरवडा, पुणे ४) यणूल अन्सारी, रा. लमाणवस्ती, येरवडा, पुणे, ५) वैजनाथ पंडीत, रा. सादलबाबा जवळ, येरवडा, पुणे ६) परमेश्वर पंडीत, रा. डेक्कन कॉलेज ग्राउाड जवळ, येरवडा, पुणे. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून १२, हजार ८००रुपयाचा.चा मुछ्देमाल जप्त करून त्यांच्या विरुध्द फरासखाना पोलीस ठोणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पुणे शहरात अवैद्य धंद्यावर होणारी धाड हे पाहून पुणेकर पुणे पोलिसांच कौतुक करत आहे तसेच काही पुणे शहरात लॉटरीवर घेणारी बीटिंग, सोरट, पुणे शहरात दारूच्या नशेत यंग हाय प्रोफाईल मुलं-मुली गाण्याच्या तालावर नाचणारे पुणे परिसरात पबमध्ये मध्यरात्रीपर्यंत दिसतात ते लवकरच बंद व्हावे व देशी व विदेशी दारू विनापरवाना २४ तास विकणारे, व पुणे चांदणी चौकातून अवैध वाहतूक, मुंबई पुणे करणाऱ्या काही फोर विलर गाड्या व एजंट यांनी चौकचौकतून चालणारे अवैद्य धंदे सुरू असलेल लवकरात लवकर बंद व्हावे हे पुणेकर वाट पाहत आहे? सदरची कारवाई ही श्री. अशोक मोराळे सो. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री.शिरीष सरदेशपांडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री.समिर शेख, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे-१ यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण वायकर, पोलीस उप निरी. दिनेश पाटील, पो.हवा. अजय थोरात, अशोक माने, पो.ना. सुभाष पिंगळे, अमोल पवार, वैभव स्वामी, तुषार माळवदकर, बाबा चव्हाण यांनी केली आहे.