मुंबई दि,२० : – रेल्वे ही देशाची लाईफ लाइन आहे दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात त्यामुळे प्रत्येक स्टेशन वर असणार्या कँटीन मध्ये लोक खात असतात आणि वस्तूचे दर पत्रक दिसेन असे लावलेले असते. पण आता रेल्वे प्रशासनाकडून नवीन नियम लागू विक्रेता बिल देत नसेल तर खाद्यपदार्थ मोफत! बऱ्याचवेळा असे पाहण्यात आले आहे की,रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ किंवा काही सामान खरेदी केले, तर त्याची बिलाची पावती विक्रेत्यांकडून मिळत नाही. मात्र, आता रेल्वे प्रशासनाकडून नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार, रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ किंवा काही सामान विकण्यासाठी आलेल्या कोणत्याही विक्रेत्यांकडून बिल नाही मिळाले तर खरेदीकेलेल्या वस्तू मोफत मिळतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत ट्विट केले आहे. ट्विटमध्ये पीयूष गोयल म्हणाले, “रेल्वेकडून No Bill, No Payment अशी योजना आणली आहे. विक्रेत्यांकडून ग्राहकांना बिल देने बंधनकारक करण्यात आले आहे. ट्रेन किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर जरएखादा विक्रेता आपल्याला बिल देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही त्याला पैसे देण्याची गरज नाही.” यासोबतच, पीयूष गोयल यांनी एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. त्यानुसार नक्की काय योजना आहे, ते समजू शकेल. ही योजना तात्काळ देशातील सर्व रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वेमध्ये लागू करण्यात येणार आहे.
दरम्यान, रेल्वे स्टेशन आणि रेल्वेमधील विक्रेत्यांबाबत प्रवाशांकडून अनेक तक्रारी येत आहेत. गेल्या तीन वर्षात फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे 7 लाख तक्रारी असल्याचे पीयूष गोयल यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी संसदेत सांगितले होते.
बाळू राऊत प्रतिनिधी