इंदापूर दि २० :- भूमि अभिलेख कार्यालय इंदापूर येथे वारस नोंद होणेसाठी व नावामध्ये बदल करण्यासाठी उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय इंदापूर येथे अर्ज केला होता. त्यावरून तक्रारदार वारस नोंद करण्यासाठी व नावामध्ये बदल करण्यासाठी परिरक्षण भूमापक सतिश गायकवाड, नेमणुक उप-अधीक्षक भुमि अभिलेख कार्यालय इंदापूर याने तक्रारदार यांच्याकडे ५, हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे कार्यालयामध्ये तक्रार नोंदविली होती तक्रारीची आज दि २० रोजी पडताळणी केली असता लोकसेवक सतिश गायकवाड, परिरक्षण भुमापक, याने तक्रारदार यांचे वारस नोंद करणेसाठी व नावामध्ये बदल करणेसाठी तक्रारदार यांचेकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ४ हजार रुपये
लाचेची मागणी केली.व आज दि २० रोजी सापळा कारवाई केली असता सापळा कारवाई मध्ये सतिश अर्जुन गायकवाड, वय ४९ वर्षे परिरक्षण भूमापक अधिकारी, भूमि अभिलेख कार्यालय
ता. इंदापूर जिल्हा पुणे राहणार ४१/३८९, न्यू बुधवार पेठ सोलापूर याने तक्रारदार यांचेकडून ४ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना भुमि अभिलेख कार्यालय ता. इंदापूर येथील कार्यालय रंगेहाथ पकण्यात आले आहे, त्याचे विरुद्ध इंदापूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे लाचलुच प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असून तपास पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर हे करीत आहेत, सदरची कारवाई मा, पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. राजेश बनसोडे व मा. अपर ्पोलीस अधीक्षक श्री. दिलीप बोरस्ते, याचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने केली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिंबधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांकावर १०६८ संपर्क साधण्यास आवाहन श्री. राकेश बनसोडे, पोलीसअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.