शेंदूरवादा दि ,२१ :- वाळुज परीसरालगत असलेल्या शेंदुरवादा येथे गोमास विक्री करणाऱ्या दुकानावर गोरक्षक दल आणि पोलीसांची धाड परीसरात गो-कत्तलखाने असल्याचे खळबळजन माहिती समोर आली.वाळुज पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शेंदुरवादा गावात गोमास विक्री करत असल्याची
माहिती दि.21 सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.ही माहिती गोरक्षक दलाला मिळताच गोरक्षक दलाचे पदाधिकार्यासह वाळुज पोलीस ठाण्याचे कर्मचारी फौजदार लक्ष्मण उंबरे एएसआय एस एस राजपुत, हेकाँ व्हि व्हि चाटे,पोना जे डी मिठ्ठे, पी सी कोतकर,चालक घुसुंगे अदी घटनास्थळी दाखल झाले.परीसरात पाहानी केली असता बर्याच घरांनमध्ये गोमास,कातडी,हड,आढळुन आले.दरम्यान वाळुज पोलिसांनी संशयतांना दाब्यात घेतले असुन पुढील तपास पोलीस करत आहे.
कमलेश नवले नेवासा