एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा काकणभर सरस कामगिरी त्या करत आहेत. स्वत:च्या हिमतीवर आणि स्वबळावर यशाची शिखरे पादाक्रांत त्यांनी केले आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, शास्त्रज्ञ, व्यापारी, खेळ,या क्षेत्रात देखील त्यांनी आपले नाव कमविले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत जलतरणपटू गीता मालुसरे विषयी जिद्द काय असते ती या १३ व्या वर्षी मुलीकडून शिकण्या
वाखण्य सारखी आहे. जिद्दीने माणूस काही ही करू शकतो
फक्त मनात एकाच विचार करायचा तो म्हणजे ध्येय, गीता ने देखील आपले ध्येय ठरवले मला ३१ किलोमीटर अंतर पार करायचे आहे. आणि मग सफर चालू झाली मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते वाशी खाडी पूल हे समुद्रातील ३१ किलोमीटर अंतर अवघ्या ४ तास ५५ मिनिटांत पोहून पार केले.तिचा उत्साह वाढवण्यासाठी सुरक्षादलाचे सैनिक व महाराष्ट्र राज्य पोलीस सातत्याने तिला शुभेच्छा देत होते. आणि अखेर तिने ३१ किलोमीटर अंतर पार केले आणि स्वतःच्या वाढदिवसी तीने हा विक्रम केला.
गीता मालुसरे यांच्या विषयी माहिती
संपूर्ण नाव : गीता महेश मालुसरे
शाळा : पुण्यातील अहिल्याबाई होळकर
इयत्ता : सातवीत शिकत आहे
मूळ गाव : मुळशी तालुक्यातील जामगाव
आवड : वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून पोहण्याचा सराव करत आहे.हे.राज्य व राष्ट्रीय पातळीच्या अनेक स्पर्धांमध्येही तिने पदके मिळविली आहेत.
प्रतिनिधित्व : गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
संकलन : बाळासाहेब राऊत