पुणे : – गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील सर्वच वृत्तपत्र संघटना व पत्रकार संघटनांनी व अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी यांचेबरोबर असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य या प्रदेश शाखेच्यावतीने राज्यशासनाकडे सातत्याने मागणी व पाठपुरावा केल्यामुळे महाराष्ट्र शासनामार्फत ज्येष्ठ अधिस्वीकतीधारक पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ २७ जुलै रोजी मुंबईत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
प्रारंभी राज्यातील वयोवृद्ध ज्येष्ठ पत्रकारांना प्रत्येकी रू. ११ हजाराचा धनादेश देऊन या योजनेचा प्रातिनिधीक स्वरूपात शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे येथील रामभाऊ जोशी, अनंत दिक्षीत, एस. के. कुलकर्णी, हॅरी डेव्हीड, विद्या विलास पाठक, मुंबई येथील लक्ष्मण जोशी, दिगंबर हंबरे, गोपाळ साक्रीकर, दिनू रणदिवे, विजय वैद्य तसेच भाऊ सिनकर (अलिबाग), किसन जाधव (उस्मानाबाद), आरिफ शेख (औरंगाबाद), मधुकर बुवा (नाशिक), महादवे मनोहर कुलकर्णी (अहमदनगर), मनोहर अंधारे (नागपूर), अरविंद कोकजे (रत्नागिरी), मधुकर भोसले (कोल्हापूर), सुरेश शहा (कुडूवाडी) यांचा समावेश आहे.
सन्मान योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीकडे भरीव निधी वर्ग केलेला असून त्या निधी रकमेच्या व्याजातून ही पत्रकार सन्मान योजना राबविण्यात येणार असल्याचे समजते. उर्वरित पात्र ज्येष्ठ अधिस्वीकृतीपत्रधारकांची काही राहिलेली अपूर्ण माहितीची पूर्तता करून घेऊन ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या बैठकीत मंजूर करून आचार्य बाळशास्त्री ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे समजते. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेऊन ही योजना मंजूर केल्याबद्दल असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश शाखेच्यावतीने अध्यक्ष आप्पासाहेब पाटील तसेच प्रसार माध्यम संपादक पत्रकार परिषदचे अध्यक्ष गोरख तावरे, अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाळ आंबेकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार महासंघाचे अध्यक्ष प्रविण पाटील, महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषदेचे नेताजी मेश्राम या सर्वानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस तसेच माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाचे महासंचालक ब्रिजेशसिंह तसेच संचालक अजय आंबेकर, शिवाजी मानकर, सुरेश वांदिले, उपसंचालक गोविंद अहंकारी, वरीष्ठ सहायक संचालक नंदिनी घाटगे या सर्वांचे पत्राद्वारे मन:पूर्वक आभार व्यक्त व्यक्त करून या योजनेचे स्वागत केले आहे