पुणे दि.०६ : – पुणे शहरातील झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे .नद्यांच्या काठावर असलेल्या घरांंच नुकसान झालेल्या भागात नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) प्रभाग क्र.३४ येथील एकता नगरी व विठ्ठल नगर परिसरातील पुरग्रस्त भागास मा.महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी भेट देऊन पाहणी
केली.या प्रसंगी मा.महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुरग्रस्त भागातील नागरिक व मा.आमदार भीमराव तापकीर, स्थानिक मनपा सभासद व क्षेत्रीय अधिकारी संतोष तांदळे यांचेशी चर्चा केली. पूरग्रस्त परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आवश्यक नियोजन करून पूरग्रस्तांना सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत त्यांनी क्षेत्रीय अधिकारी संतोष तांदळे यांना आदेश .
दिले.याप्रसंगी मा.प्रसन्न घनःशाम जगताप,मा.सौ.ज्योती किशोर गोसावी मा.सौ.मंजुषा दीपक नागपुरे,मा.श्रीकांत शशिकांत जगताप व सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.मुंढवा येथील राजगे वसाहतीमधील २७ कुटुंबीय (६० व्यक्ती) यांचे पूरग्रस्त नजीकच्या राजश्री शाहू शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच सर्वोदय कॉलनीतील २० घरे पुराच्या
पाण्यामुळे बाधित झाल्यामुळे या निवासस्थानातील नागरिक.
..नातेवाईकांचे घरी गेले आहेत. प्रभाग क्र.२२ येथील राजगे आळीतील बाधित कुटुंबीय येथील अण्णाभाऊ साठे समाजमंदिरात स्थलांतरित करण्यातआले आहे.
तसेच केशव नगर येथील १७ व्यक्तींनाही स्थलांतरित करण्यात आल्याचे सह महापालिका आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितलं आहे. व पूरबाधितांच्या भेटी घेवून तेथील परिस्थितीची माहिती घेतली.