पुणे, दि. १५ :-पुणे शहरात घरफोडी करणार्या तीन चोराना समर्थ पोलिसांनी आपल्या ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, मानाराम चौधरी यांचे राजेवाडी येथील किराणा मालाचे दुकानास कुलुप लावून ते दि ४/६/२०१९ रोजी गावाला गेले असताना त्यांच्या घराचे वरच्या मजल्यावरील हाॅलचे गॅलरीमधील मधील खिडकीचे खिडकीचे ग्रिलला लावलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी फोडून ३ लाख १८ हजार ७५० रूपयांचे सोन्याचांदीचे दागिने घरफोडी करून चोरले. याबाबत रोहन घाडगे (वय १८), त्याचा अल्पवयीन सख्खा भाऊ व मित्र उमरान शेख (वय १९, सर्व रा. नाना पेठ) हे अपोलो टॉकिज परिसरात सदर दागिने विकण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्याना अटक केली. चोरीतील वरील सर्व माल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, पोलिस सह आयुक्त रविंद्र शिसवे, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ-१ च्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, फरासखान्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदिप आफळे, समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलिस निरीक्षक विनायक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, हवालदार सुशिल लोणकर, राजस शेख, संतोष काळे, पोलिस नाईक टिळेकर, शिपाई साहिल शेख, अनिल शिंदे निलेश, साबळे, सचिन पवार, सुरज धनवट, सुमित खुटे, गणेश कोळी, स्वप्निल वाघिले यांनी केली आहे.